auto add

Saturday, July 1, 2017

आरती संग्रह


              
।।आरती संग्रह।।



।। श्री. गणपतीची आरती ।।
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥२॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ ३ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
*****
pandurang2.jpg


।। आरती श्री विठ्ठलाची ।।
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पाण्डुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी । कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।।
देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।।
राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती । चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती । पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥

*****


।। आरती श्री. दत्ताची ।।
त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैंचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। २ ।।
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। ३ ।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।। ४ ।।
- संत एकनाथ
*****

।। आरती ज्ञानदेवाची ।।
आरती ज्ञानराजा ॥
महाकैवल्यतेजा ॥
सेविती साधुसंत ॥
मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥
लोपलें ज्ञान जगीं ॥
त नेणती कोणी ॥
अवतार पांडुरंग ॥
नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ॥ १ ॥
कनकांचे ताट करीं ॥
उभ्या गोपिका नारी ॥
नारद तुंबरु हो ॥
साम गायन करी ॥ आरती० ॥ २ ॥
प्रगट गुह्य बोले ॥
विश्व ब्रह्मची केलें ॥
रामा जनार्दनीं ॥
पायीं ठकचि ठेलें ॥ आरती० ॥ ३ ॥

*****

।। आरती तुकारामाची ।।
आरती तुकारामा ।
स्वामी सदगुरूधामा ।।
सच्चिदानंदमूर्ती ।
पाय दाखवीं आम्हा ।। १।। 
आरती तुकारामा।।धृ।। 
राघवें सागरांत ।
पाशाण तारीले ।।
तैसे हे तुकोबाचे ।
अभंग उदकीं रक्षिले ।।२।।
तुकीतां तुलनेसी ।
ब्रह्ना तुकासी आलें ।।
म्हणोनी रामेश्वरें । 
चरणीं मस्तक ठेविलें ।।३।।
*****

।। आरती दुर्गा मातेची ।।
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥

वारी वारी जन्ममरणांतें वारी ।

हारी पडलो आता संकट निवारी ॥ 1

जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥

त्रिभुवनभुवनी पाहता तुजऐसी नाही ।

चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥

साही विवाद करिता पडिले प्रवाही ।

ते तूं भक्तांलागी पावसि लवलाही ॥ २ ॥ जय देवी

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।

क्लेशांपासुनि सोडवी तोडी भवपाशा ॥

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा 

नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥ जय देवी

******

।। घालिन लोटांगन आरती ।।
घालीन लोटांगण, वंदीन चरण ।डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।
त्वमेव माता च पिता त्वमेव।त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।
कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि ।।३।।
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।

No comments:

Post a Comment