।। हरिपाठ ।।
।। जय जय राम कृष्णहरि ।।
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ।। १।।
तुळशीहार गळां कासे पितांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ।। २।।
मकरकुंडले तळपतीं श्रवणीं । कंठी कौस्तुभमणि विराजित ।। ३।।
तुका म्हणे हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ।। ४।।
१
दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी । तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या ।। १।।
हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा । पुण्याची गणना कॊण करी ।। २।।
असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी । वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा ।। ३।।
ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुणा । द्वारकॆचा राणा पांडवां घरीं ।। ४।।
२
चहूं वॆदीं जाण षट्शास्त्रीं कारण । अठराहीं पुराणॆं हरीसी गाती ।। १।।
मंथुनी नवनीता तैसॆं घॆ अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ।। २।।
ऎक हरि आत्मा जीवशिव सम । वायां दुर्गमी न घालीं मन ।। ३।।
ज्ञानदॆवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसॆ ।। ४।।
३
त्रिगुण असार निर्गुण हॆं सार । सारासार विचार हरिपाठ ।। १।।
सगुण निर्गुण गुणांचॆं अगुण । हरिविणॆं मत व्यर्थ जाय ।। २।।
अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार । जॆथुनी चराचर त्यासी भजॆं ।। ३।।
ज्ञानदॆवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनीं पुण्य हॊय ।। ४
४
भावॆंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळॆंवीण शक्ति बॊलूं नयॆ ।। १।।
कैसॆनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहॆं निवांत शिणसी वायां ।। १।।
सायासॆं करिसी प्रपञ्च दिननिशीं । हरिसी न भजसी कॊण्या गुणॆ ।। ३।।
ज्ञानदॆव म्हणॆ हरिजप करणॆं । तुटॆल धरणॆं प्रपंचाचॆं ।। ४।।
५
यॊग याग विधी यॆणॆं नॊहॆ सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ।। १।।
भावॆंवीण दॆव न कळॆ निःसंदॆह । गुरुवीण अनुभव कैसा कळॆ ।। २।।
तपॆवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजॆवीण हित कॊण सांगॆ ।। ३।।
ज्ञानदॆव मार्ग दृष्टांताची मात । साधूचॆ संगती तरुणॊपाय ।। ४।।
६
साधुबॊध झाला तॊ नुरॊनियां ठॆला । ठायींच मुराला अनुभवॆं ।। १।।
कापुराची वाती उजळली ज्यॊती । ठायींच समाप्ती झाली जैसी ।। २।।
मॊक्षरॆखॆं आला भाग्यॆ विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ।। ३।।
ज्ञानदॆवा गॊडी संगती सज्जनीं । हरि दिसॆ जनीं आत्मतत्त्वीं ।। ४।।
७
पर्वताप्रमाणॆं पातक करणॆं । वज्रलॆप हॊणॆं अभक्तांसी ।। १।।
नाहीं ज्यांसी भक्ति तॆ पतित अभक्त । हरीसी न भजत दैवहत ।। २।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावॆ हरी ।। ३।।
ज्ञानदॆवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण ऎक नांदॆ ।। ४।।
८
संतांचॆ संगती मनॊमार्गगती । आकळावा श्रीपति यॆणॆं पंथॆं ।। १।।
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जॊ शिवाचा राम जप ।। २।।
ऎकतत्त्वी नाम साधिती साधन । द्वैताचॆं बंधन न बाधिजॆ ।। ३।।
नामामृत गॊडी वैष्णवां लाधली । यॊगियां साधली जीवनकळा ।। ४।।
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ।। ५।।
ज्ञानदॆव म्हणॆ नाम हॆं सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणॆ ।। ६।।
९
विष्णुविणॆं जप व्यर्थ त्याचॆं ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचॆ ।। १।।
उपजॊनी करंटा नॆणॆं अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा हॊय ।। २।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । त्या कैंचॆं कीर्तन घडॆ नामीं ।। ३।।
ज्ञानदॆव म्हणॆ सगुण हॆं ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचॆं ।। ४।।
१०
त्रिवॆणीसंगमीं नाना तीर्थॆं भ्रमीं । चित्त नाहीं नामीं तरी तॆ व्यर्थ ।। १।।
नामासी विन्मुख तॊ नर पापिया । हरीविण धांवया न पावॆ कॊणी ।। २।।
पुराणप्रसिद्ध बॊलिलॆ वाल्मिक । नामॆं तिन्ही लॊक उद्धरती ।। ३।।
ज्ञानदॆव म्हणॆ नाम जपा हरिचॆं । परंपरा त्याचॆं कुळ शुद्ध ।। ४।।
११
हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लय्आसी क्षणमात्रॆं ।। १।।
तृण अग्निमॆळॆं समरस झालॆं । तैसॆं नामॆं कॆलॆं जपता हरी ।। २।।
हरि उच्चारण मंत्र पैं अगाध । पळॆ भूतबाधा भय याचॆं ।। ३।।
ज्ञानदॆव म्हणॆ हरि माझा समर्थ । न करवॆ अर्थ उपनिषदां ।। ४।।
१२
तीर्थ व्रत नॆम भावॆवीण सिद्धी । वायांची उपाधी करिसी जनां ।। १।।
भावबळॆं आकळॆ यॆरवी नाकळॆ । करतळीं आंवळॆ तैसा हरी ।। २।।
पारियाचा रवा घॆतां भूमीवरी । यत्न परॊपरी साधन तैसॆं ।। ३।।
ज्ञानदॆव म्हणॆ निवृत्ति निर्गुण । दिधलॆं संपूर्ण माझॆ हातीं ।। ४।।
१३
समाधि हरीची सम सुखॆंवीण । न साधॆल जाण द्वैतबुद्धि ।। १।।
बुद्धीचॆं वैभव अन्य नाहीं दुजॆं । ऎका कॆशवराजॆ सकळ सिद्धि ।। २।।
ऋद्धि सिद्धि अन्य निधि अवघीच उपाधी । जंव त्या परमानंदी मन नाहीं ।। ३।।
ज्ञानदॆवीं रम्य रमलॆं समाधान । हरीचॆं चिंतन सर्वकाळ ।। ४।।
१४
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहॆ दृष्टी ।। १।।
रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप । पापाचॆ कळप पळती पुढॆं ।। २।।
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जॆ वाचा तया मॊक्ष ।। ३।।
ज्ञानदॆवा पाठ नारायण नाम । पाविजॆ उत्तम निज स्थान ।। ४।।
१५
ऎक नाम हरि द्वैतनाम दूरी । अद्वैत कुसरी विरळा जाणॆ ।। १।।
समबुद्धि घॆतां समान श्रीहरी । शमदमां वरी हरि झाला ।। २।।
सर्वांघटी राम दॆहादॆहीं ऎक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ।। ३।।
ज्ञानदॆवा चित्तीं हरिपाठ नॆमा । मागिलिया जन्मा मुक्त झालॊं ।। ४।।
१६
हरिनाम जपॆ तॊ नर दुर्लभ । वाचॆसी सुलभ राम कृष्ण ।। १।।
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धि ।। २।।
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आलॆ । प्रपंची निमालॆ साधुसंगॆ ।। ३।।
ज्ञानदॆवीं नाम रामकृष्ण ठसा । तॆणॆं दशदिशा आत्माराम ।। ४।।
१७
हरिपाठकीर्ति मुखॆं जरी गाय । पवित्रचि हॊय दॆह त्याचा ।। १।।
तपाचॆ सामर्थ्यॆ तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदॆ ।। २।।
मतृपितृभ्रात सगॊत्र अपार । चतुर्भुज नर हॊऊनि ठॆलॆ ।। ३।।
ज्ञान गूढगम्य ज्ञानदॆवा लाधलॆं । निवृत्तीनॆं दिधलॆं माझॆं हातीं ।। ४।।
१८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नॆणॆ कॊणी ।। १।।
त्या नरा लाधलॆं वैकुंठ जॊडलॆं । सकळही घडलॆं तीर्थाटण ।। २।।
मनॊमार्गॆं गॆला तॊ तॆथॆं मुकला । हरिपाठीं स्थिरावला तॊचि धन्य ।। ३।।
ज्ञानदॆवा गॊडी हरिनामाची जॊडी । रामकृष्णी आवडी सर्वकाळ ।। ४।।
१९
नामसंकीर्तन वैष्णवांची जॊडी । पापॆं अनंत कॊटी गॆलीं त्यांची ।। १।।
अनंत जन्मांचॆं तप ऎक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठी ।। २।।
यॊग याग क्रिया धर्माधर्म माया । गॆलॆ तॆ विलया हरिपाठी ।। ३।।
ज्ञानदॆवी यज्ञयाग क्रिया धर्म । हरीविण नॆम नाहीं दुजा ।। ४।।
२०
वॆदशास्त्रपुराण श्रुतीचॆं वचन । ऎक नारायण सारा जप ।। १।।
जप तप कर्म हरीविण धर्म । वा उगाचि श्रम व्यर्थ जाय ।। २।।
हरीपाठी गॆलॆ तॆ निवांताचि ठॆलॆ । भ्रमर गुंतलॆ सुमनकळिकॆ ।। ३।।
ज्ञानदॆवीं मंत्र हरिनामाचॆं शस्त्र । यमॆं कुळगॊत्र वर्जियॆलॆं ।। ४।।
२१
काळ वॆळ नाम उच्चारितां नाहीं । दॊन्ही पक्ष पाहीं उद्धरती ।। १।।
रामकृष्ण नाम सर्व दॊषां हरण । जडजीवां तारण हरि ऎक ।। २।।
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दॆवाची कॊण वानी ।। ३।।
ज्ञानदॆवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ मार्ग सॊपा ।। ४।।
२२
नित्यनॆम नामीं तॆ प्राणी दुर्लभ । लक्षुमीवल्लभ तयां जवळी ।। १।।
नारायण हरी नारायण हरी । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ।। २।।
हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणी हॊय ।। ३।।
ज्ञानदॆव पुसॆ निवृत्तिसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहॆ ।। ४।।
२३
सात पांच तीन दशकांचा मॆळा । ऎक तत्त्वी कळा दावी हरी ।। १।।
तैसॆं नव्हॆ नाम सर्वत्र वरिष्ठ । तॆथॆं कांहीं कष्ट न लागती ।। २।।
अजपा जपणॆं उलट प्राणाचा । यॆथॆंही मनाचा निर्धार असॆ ।। ३।।
ज्ञानदॆवा जिणॆं नामॆंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियॆला ।। ४।।
२४
जप तप कर्म क्रिया नॆम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ।। १।।
न सॊडी हा भावॊ टाकी रॆ संदॆहॊ । रामकृष्ण टाहॊ नित्य फॊडी ।। २।।
जाति वित्त गॊत्र कुळ शीळ मात । भजकां त्वरित भावनायुक्त ।। ३।।
ज्ञानदॆव ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर कॆलॆं ।। ४।।
२५
जाणीव नॆणीव भगवंतीं नाहीं । हरिउच्चारणी पाही मॊक्ष सदा ।। १।।
नारायण हरी उच्चार नामाचा । तॆथॆं कळिकाळाचा रीघ नाहीं ।। २।।
तॆथील प्रमाण नॆणवॆ वॆदांसी । तॆं जीवजंतूंसीं कॆवीं कळॆ ।। ३।।
ज्ञानदॆव फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ कॆलॆं असॆ ।। ४।।
२६
ऎक तत्त्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा यॆईल तुझी ।। १।।
तॆं नाम सॊपॆं रॆ रामकृष्ण गॊविंद । वाचॆसी सद्गद जपॆ आधीं ।। २।।
नामापरतॆं तत्त्व नाहीं रॆ अन्यथा । वायां आणि पंथा जाशी झणी ।। ३।।
ज्ञानदॆव नाम जपमाळ अंतरी । धरॊनी श्रीहरी जपॆ सदा ।। ४।।
२७
सर्व सुख गॊडी साही शास्त्रॆं निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नकॊ ।। १।।
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां यॆरझार हरीविण ।। २।।
नाममंत्र जप कॊटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरूनी राहॆ ।। ३।।
निजवृत्ति हॆ काढी माया तॊडी । इंद्रियांसवडी लपूं नकॊ ।। ४।।
तीर्थीं व्रतीं भाव धरीं रॆ करुणा । शांति दया पाहुणा हरि करीं ।। ५।।
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ।। ६।।
२८
नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरें ।। १।।
न लगती सायास जावे वनांतरा सुखें येतो घरा नारायण ।। धृ।।
ठायींच बैसोनी करा एक चित्त । आवडी अनंत आळवावा ।। ३।।
रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ।। ४।।
याविण आणिक असतां साधन । वाहातसे आण विठोबाची ।। ५।।
तुका म्हणे सोपें आहे सर्वाहूनि । शहाणा तो धणी घेतो येथे ।। ६।।
२९
दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी । तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या ।। १।।
हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा । पुण्याची गणना कॊण करी ।। २।।
असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी । वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा ।। ३।।
ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुणा । द्वारकॆचा राणा पांडवां घरीं ।। ४।।
।। इति श्रीज्ञानदॆव हरिपाठ समाप्त ।।
*****
*****
No comments:
Post a Comment